ऑनलाईन टीम
केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून तीव्र आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागले असल्याचे पहायला मिळाले. आज पुन्हा याच मागणीवरुन शेतकरी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आज चक्क आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होत भाजपा नेत्याचे कपडे फाडल्याची घटना समोर आली आहे.
आज दुपारी राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं केंद्रीय कायद्यांचा विरोध करत होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात होती. याचदरम्यान आंदोलनस्थळी भाजपा नेते आणि एससी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश मेघवाल आल्यामुळे वातावरणात तणावपुर्ण बनले. इतकच नाही तर, शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. यावेळी भाजपा नेत्यासोबत झालेल्या बाचाबाचीनंतर आंदोलकांनी भाजपा नेते मेघवाल यांचे कपडे फाडले.











