असळज/प्रतिनिधी
गगनबावडा तालुक्यातील शेणवडे या ग्रामपंचायतील व शाळेमधील संगणक व प्रिटरचे साहित्य चोरट्यानी लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. साळवण पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी शेणवडे येथील ज्ञानेश्वर विद्यालयात चोरी झाली होती. यात शाळेतील तीन संगणक चोरट्यांनी लंपास केले होते. तर ग्रामपंचायत शेणवडे येथील संगणक व प्रिंटर असा चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी साळवण पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.









