प्रतिनिधी / गारगोटी
भुदरगड पोलीस ठाणे हद्दीतील शेणगाव येथे पत्यांच्या खेळाचा जुगार अड्यावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेतले. तर 4,21,500/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत रोख रक्कम 16500,वेगवगळ्या कंपनीचे एकुण 11 मोबाईल 45000 किंमतीचे तर वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल एकूण – 6 त्यांची एकुण किंमत – 3,60,000/-रुपये असा एकुण 4,21,500/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतले असुन अटक करण्यात आली. पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मयेकर, सतीश पाटील, किरण पाटील, पो कॉ शिंदे, युवराज पाटील, विकास पाटील, बसरवाडकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.









