बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना सेवेत गुंतलेल्या शेकडो ज्येष्ठ निवासी डॉक्टरांना अडीच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या चिकित्सकांनी यावर्षी ऑगस्टमध्ये एमडी आणि एमएस डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर समुपदेशन व गुणवत्तेच्या आधारे त्यांना एक वर्षासाठी अनिवार्य कोरोना ड्युटीवर पाठवण्यात आले. सप्टेंबरपासून अशा शेकडो डॉक्टर सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात कर्तव्यावर आहेत. बरेच डॉक्टर जिल्हा व तालुका रुग्णालयात आपली सेवा देत आहेत.
मंड्या शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टरांनी बोलतांना सप्टेंबरपासून पगार मिळालेला नाही. काही रुग्णालयांनी डॉक्टरांसाठी नि: शुल्क निवास व्यवस्था केली आहे. परंतु बरेच डॉक्टर त्यांच्या खर्चावरच थांबले आहेत.
कर्नाटक असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (केआरडी) च्या माहितीनुसार शिवमोगा, मंड्या, कारवार, गदग आणि चामराजनगर जिल्ह्यात काम करणाऱ्या डॉक्टरांची अवस्थाही अशीच आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापनाने येत्या एका आठवड्यात पगाराचे आश्वासन दिले आहे, तर तालुका रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टरांना जानेवारीपर्यंत थांबायला सांगितले आहे. राज्यातील १५-२० वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही डॉक्टर सेवा देत आहेत. यातील चार महाविद्यालयांमध्ये कार्यरत डॉक्टरांना मोबदला देण्यात आला आहे. ही चार महाविद्यालये बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत.
केआरडीचे सदस्य डॉक्टर यांनी, कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी सरकारने दरमहा ६० हजार रुपये देण्यास सांगितले होते. अडीच महिने झाले तरी एक पैसाही दिलेला नाही.