रिलायन्सने नेंदवला नवा विक्रम : निफ्टी 11,194.15 वर
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी पुन्हा बुधवारच्या सत्राप्रमाणेच घसरण नेंदवत बाजार बंद झाला आहे. दिवसभरात बाजारात चढउतराचे वातावरण राहिले होते. यामुळे हलकीशी घसरण सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पहावयास मिळाली आहे. सदर कामगिरीत देशातील काही समभाग मात्र नफ्यात राहिल्याने जागतिक पातळीवरील घसरणीची तीव्रता काहीशी कमी करण्यास मदत झाल्याचे म्हटले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स दिवसअखेर 11.57 अंकांनी घसरुन निर्देशांक 38,128.90 वर बंद झाला असून दिवसभरात मात्र सेन्सेन्स 487 अंकांवर चढउतारामध्ये राहिला आहे. दुसऱया बाजूला निफ्टी दिवसअखेर 21.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,194.15 वर बंद झाला आहे.
आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी मात्र सर्वाधिक नफ्यात राहिलेल्या कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग तीन टक्क्यांपेक्षा अधिकने घसरले आहेत. सोबत स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक बँक यांचे समभागही घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 4 टक्क्मयांपेक्षा अधिकने मजबूत झाले असून कंपनीने तब्बल 14 लाख कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा, सन फार्मा, इंडसइंड बँक, इन्फोसिसाचाही तेजीत समावेश झाला आहे.
शुक्रवारी सकाळी सेन्सेक्सची सुरूवात मागच्या सत्राच्या तुलनेत 190 अंकांनी घसरणीसह झाली. रिलायन्सच्या तेजी व्यतिरिक्त अमेरिका आणि चीन यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजार घसरणीत राहिले आहेत. यामुळे काही प्रमाणात देशातील शेअर बाजारात दबावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूडचा वायदा भाव 1.09 टक्क्मयांनी वधारुन 43.77 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला आहे. देशातील वाढती कोविडची रुग्ण संख्या ही गुंतवणूकदारांवर प्रभाव टाकत असल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.








