सेन्सेक्स 612 तर निफ्टी 185 अंकांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील पहिल्या दिवशी सोमावरी मजबूत तेजी नोंदवल्यानंतर भारतीय शेअर बाजारातील दुसऱया सत्रातही मंगळवारी तेजी नोंदवली आहे. यामध्ये मंगळवारी सेन्सेक्स 612 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये प्रमुख कंपन्यांपैकी वाहन क्षेत्रामधील कंपन्यांच्या समभागाची चौफेर विक्री झाल्याची नोंद केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 612.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 50,193.33 वर बंद झाला आहे. तसेच दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 184.95 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 15,108.10 वर बंद झाला आहे.
मंगळवारच्या सत्रात सेन्सेक्समधील 30 मधील 26 समभागांमध्ये वाढ राहिली आहे. यामध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि बजाज ऑटोचे समभाग 5 ते 5 टक्क्यांनी वाढत राहिली आहे. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग 2 टक्के आाि आयटीसीचे समभाग 1 टक्क्यांनी घसरले आहेत. शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, इन्फोसिससह अन्य कंपन्या 1 ते 1 टक्क्यांनी वधारले आहेत.
एक्सचेंजमधील 3,254 समभागमधील ट्रेडिंग झाले आहे. यामध्ये 1,950 समभाग वाढले आणि 1,134 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. बीएसईमधील यादीमधील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 216.51 लाख कोटी रुपयावर राहिले आहे. सोमवारी हा आकडा 213.64 लाख कोटी रुपये होता.
प्रारंभाची तेजी
दुसऱया दिवशी मंगळवारी सकाळी सेन्सेक्स 405.95 अंकांनी वधारुन प्रारंभ झाला होता. या वाढीसोबत सेन्सेक्स 50 हजार आणि निफ्टी 15 हजारवर पोहोचला होता. जागतिक पातळीवरील बाजारामध्ये आशियातील जपानचा निक्कोईचा निर्देशांक 613 अंकांनी वधारला आहे. तर चीनचा शांघाय कंपोजिट निर्देशांक 3 अंकांनी वाढीसोबत बंद झाला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 410 अंकांनी वाढल्याचे पहावयास मिळाले आहे. या सकारात्मक वातावरणाचा लाभ हा भारतीय शेअर बाजारावर राहिला असून हा येत्या काळात याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.









