ऑनलाईन टीम / मुंबई :
आज अर्थसंकल्प सादर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच आज सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला होता. त्यानंतर तो पुन्हा सावरला.
अर्थसंकल्पामुळे आज शनिवार असूनही शेअर बाजार सुरू आहे. सध्या शेअर बाजार 140 अंकांनी कोसळून 40,576 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 126.50 अंकांनी घसरून तो 11,910 वर स्थिरावल्याचे दिसते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोडय़ाच वेळात तो सादर करतील. बाजारात मोठय़ा घडामोडीची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगली आहे. दिवसाच्या सुरुवातीला कोसळलेले शेअर मार्केट पुन्हा सावरताना दिसत आहे.








