बाजार सुरू होताच गुंतवणूकदारांचे अडीच लाख पाण्यात
मुंबई / वृत्तसंस्था
शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स पहिल्याच मिनिटात 1,006 अंकांनी घसरून 55,241 वर आला आल्यामुळे गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. सध्याच्या जागतिक पातळीवरील अस्थिर वातावरणामुळे बँकिंग स्टॉक्सला फटका बसत आहे. विशेषतः रशिया-युक्रेन युद्धाचे पडसादही उमटत आहेत. बुधवारी दिवसभरात बीएसई निर्देशांकात 1,200 अंकांपर्यंत घसरण झाली होती. मात्र, दिवसअखेर 778.38 अंक म्हणजे 1.38 टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर बीएसई निर्देशांक 55,468.90 अंकांवर बंद झाला. तसेच निफ्टी निर्देशांक 187.95 अंकांच्या घसरणीसह 16,605.95 अंकांवर बंद झाला.









