वृत्तसंस्था / मुंबई :
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रातील कामगिरीत सेन्सेक्समधील तेजीला ब्रेक लागण्याचे बुधवारी पहावयास मिळाले होते. परंतु पुन्हा गुरुवारच्या सत्रात सेन्सेक्सने एकदम तेजी प्राप्त केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह परतल्याचे पहायला मिळाले. यामध्ये बीएसई सेन्सेक्स जवळपास 409 अंकांची उसळी घेत 36,737.69 वर बंद झाला आहे.
जागतिक बाजारातील मजबूत कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने झेप घेतली आहे. दिवसभरातील क्यवहारात एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि रिलयान्स इंडस्ट्रीजमधील समभागांच्या तेजीने बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवभरातील व्यवहारात सेन्सेक्सने 36,806.30 अंकांचा उच्चांक गाठला होता.
गुरुवारी सेन्सेन्स जवळपास 408.68 अंकांनी वधारुन निर्देशांक 36,737.69 वर बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 107.70 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,813.45 वर स्थिरावला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये सर्वाधिक तेजीत बजाज फायनान्स राहिली असून याचे समभाग जवळपास 4 टक्मक्मयांनी वधारले आहेत. सोबत स्टेट बँक, टाटा स्टील, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. मात्र ओएनजीसी, टेक महिंद्रा, टीसीएस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आणि ऑटो क्षेत्रातील मारुती सुझुकीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
देशातील शेअर बाजार सकारात्मक वातावरणातच सुरु झाले होते. कालचा कल पाहता आजही बाजार खाली जाणार की काय असा संभ्रम होता. तसेच आशियातील शेअर बाजार तेजीत राहिले असून याचा प्रभाव देशातील बाजारावर पडला. तर आंतरराष्ट्रीय तेल मानाकंन ब्रँड क्रूडचा वायदा भाव 0.05 टक्क्मयांनी मजबूत होत 43.31 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचला होता. दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 3 पैशांनी मजबूत होत 74.99 वर बंद झाला.








