सेन्सेक्स 304 तर निफ्टी 159.05 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्सने 304 अंकांची उसळी नेंदवली आहे. सदरचा तेजीचा प्रवास कायम ठेवण्यासाठी बाजाराला रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिस यांच्या समभागांची मजबूत साथ मिळाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 304.38 अंकांच्या तेजीसोबत 39,878.95 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 76.45 अंक वाढीसह 11,738.85 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये बुधवारी टायटनचे समभाग सर्वाधिक म्हणजे 4 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. सोबत बजाज ऑटो, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग कमाईत राहिले होते. दुसऱया बाजूला मात्र बजाज फायनान्स, पॉवरग्रिड कॉर्प, टाटा स्टील, एनटीपीसी आणि सन फार्मा आदी कंपन्यांची घसरण झाली आहे.
तिसऱया दिवशी शेअर बाजाराने तेजीचा कल कायम राखत बाजाराला मजबूत दिशा दिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. बुधवारपासून पतधोरण समितीची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये तीन नवीन सदस्यांची नियुक्ती केली असून सदरची बैठक ही येत्या 9 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार असल्याने बैठकीतील निर्णयाकडे गुंतवणूकदारांची नजर लागून राहिली असल्याची माहिती यावेळी तज्ञांनी दिली आहे.
निवडक क्षेत्रांची बाजी
मागील काही दिवसांपासून सिमेंट आणि काही औषध कंपन्यांमधील होणाऱया सततच्या लिलावाचा लाभ हा देशातील शेअर बाजाराला झाल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे तोटय़ातील क्षेत्रांना गती देण्यासाठी नवीन धोरण सादर होण्याची अपेक्षा ठेवून काही कंपन्या कार्य करत असल्याचाही फायदा झाला आहे.
आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूट 1.59 टक्क्मयांनी घसरुन 41.97 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.