अंतिम दिवशी सेन्सेक्स 523.68 अंकांनी तेजीत : रिलायन्सची झेप
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजाराचा चालू आठवडय़ाचा समारोप तेजीच्या प्रवासासोबत झाला आहे. यामध्ये शुक्रवारी अंतिम दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे वधारलेले समभाग आणि जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे देशातील बाजाराचा कल तेजीकडे राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दोन दिवसांपासून देशातील लडाख खोऱयात भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणावाचे वातावरण असून या संघर्षात भारताचे जवळपास 20 जवान शहीद झाले आहेत. सध्याच्या घडीला त्यावर योग्य चर्चा करण्यासाठीच्या बैठका भारताकडून केल्या जात आहेत. या घटनेचा प्रभाव काही प्रमाणात गुंतवणूकदारांवर राहणार असल्याचे अभ्यासक म्हणत आहेत.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्स 640.32 अंकांनी वधारला होता. ही कामगिरी प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमधून दिसून आली आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 523.68 वधारुन निर्देशांक 34,731.73 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 152.75 अंकांनी वधारत निर्देशांक 10,244.40 वर बंद झाला.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांनी वधारले आहेत तर अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सहा टक्क्मयांनी तेजीत होते. ही तेजी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी कर्जमुक्तीचे ध्येय हे निश्चित वेळेच्या अगोदरच पूर्ण केले असल्यामुळे दिसले असल्याचे सांगितले जाते. कंपनीचे समभाग नफ्यात राहिले असून याचाच परिणाम शेअर बाजारातील व्यवहारांवर राहिल्याचे दिसून आले आहे. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयटीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एचडीएफसी यांचे समभाग मात्र घसरले आहेत.
विश्लेषकांच्या माहितीनुसार विदेशी कोषाच्या प्रवाहामुळे बाजारातील तेजी मजबूत राहिली असून अर्थव्यवस्थेला सावरण्याचा कल सकारात्मक राहिल्याचे सांगितले आहे. दुसऱया बाजूला अमेरिका आणि चीनमध्ये कोविडची नवी प्रकरणे समोर येत असतानाही शेअर बाजारात तेजी राहिली होती. याचाच प्रभाव जागतिक बाजारावर राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.








