एचडीएफसी, रिलायन्सचे समभाग तेजीत : निफ्टी 14,500 च्या वर
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी सलग तिसऱया सत्रात भारतीय शेअर बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. नफावसुलीमुळे दबावात सेन्सेक्सचा निर्देशांक 530 अंकांच्या घसरणीसह तर निफ्टी 133 अंकांच्या घसरणीसह बंद झाले.
सोमवारी सेन्सेक्स 530 अंकांच्या घसरणीसह 48,347.59 अंकांवर तर निफ्टी 133 अंकांच्या घसरणीसह 14,238.90 अंकांवर बंद झाला. सोमवारी सकाळी सेन्सेक्सचा निर्देशांक व निफ्टीचा निर्देशांक तेजीसह सुरू झाला खरा पण शेवटपर्यंत तेजी काही कायम राहू शकली नाही. सकाळी 9.15 वा सेन्सेक्स 375 अंकाच्या वाढीसह व निफ्टी 105 अंकाच्या वाढीसह व्यवहार करत होता. अथ
&मंत्री निर्मला सीतारामन या पुढच्या सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार असल्याने त्यावर बाजाराची नजर आहे. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर शेअर बाजाराला निश्चित दिशा मिळू शकणार आहे.
निफ्टी फार्मा निर्देशांक मात्र पावणेदोन टक्के इतक्या तेजीत होता. याशिवाय वित्त सेवा आणि धातु निर्देशांकातही तेजी राहिली होती. आयटी निर्देशांकाने मात्र या उलट 2 टक्के इतकी घसरण नोंदवली होती. निफ्टी निर्देशांकात 18 कंपन्यांचे समभाग तेजीत तर 31 समभाग घसरण नोंदवत बंद झाले. सेन्सेक्समधील 9 समभागांमध्ये तेजी दिसली तर 21 समभागांनी नुकसान सोसलं.
मजबूत तिमाही निकाल व जागतिक बाजारांनी दाखवलेली तेजी पाहता भारतीय बाजारांनी तेजीसह सुरुवात केली. सेन्सेक्स एकावेळी 48800 वर तर निफ्टी निर्देशांक 14300 अंकांवर व्यवहार करत होता. बाजारात काहीशी सुस्ती दिसून आली. यातही फार्मा व बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या नफा नोंदवत होत्या.
दुपारी 12.30 वा. सेन्सेक्स 25 अंकांच्या घसरणीसह 48,853.16 वर तर निफ्टी 4 अंकांच्या किंचीत घसरणीसह 14,376.50 अंकांवर होता. यात रिलायन्सचा समभाग 4 टक्के घसरण नोंदवत होता. ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, एशियन पेंटस् यांचे समभागही 2 टक्के घसरणीत होते. दुसरीकडे मात्र ग्रेसीमचा भाव 10 टक्के वाढीव दिसून आला. याचप्रमाणे युपीएल व सिप्ला यांचे समभागही 4 टक्मयांची तेजी दर्शवत होते.
जागतिक बाजार
कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने व कोरोना व्हॅक्सीन (लस) पुरवण्यात होणारा उशीर आशियाई बाजारासाठी चिंता वाढवणारा ठरला आहे. सुरुवातीला सर्वच निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. जपानचा निक्की 0.42 टक्के, चिनचा शांघाई कम्पोझीट 9.49 टक्के व हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 1.62 टक्के तेजी दर्शवत होता. कोरीयाचा कोस्पी व ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजारही तेजी दर्शवत होता. शुक्रवारी अमेरिकेतील बाजारात विक्रीचा जोर दिसला. आयबीएम व इंटेल या कंपन्या सामील होत्या.
मंगळवार 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त बाजार बंद राहणार आहे.








