सेन्सेक्स 86 अंकांनी वधारला : जागतिक संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सचा तेजीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणाचा फायदा घेत दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांनी तेजी नोंदवली आहे.
दिवसभरातील कामगिरीमुळे सेन्सेक्स 86 अंकांनी वधारत बंद झाला आहे. तसेच सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान 38,788.51 चा टप्पा पार केला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 86.47 टक्क्मयांनी वधारुन निर्देशांक 38,614.79 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 23.05 अंकांनी वाढून sिनर्देशांक 11,408.40 वर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे समभाग दोन टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. तर सोबत भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेन्ट्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत. दुसऱया बाजूला बजाज ऑटो, ओएनजीसी, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग घसरले आहेत.
अमेरिकेतील शेअर बाजाराचा कल विक्रमी पातळीवर पोहोचला होता सोबत जागतिक बाजारामध्ये सकारात्मक वातावरण राहिल्याने त्याचा फायदा देशातील बाजाराला झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे. भांडवलातील गुंतवणुकीच्या वेगामुळेही बाजाराची स्थिती मजबूत झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. एक्सचेंजकडे उपलब्ध असणाऱया आकडय़ानुसार विदेशी संस्थांकडून मंगळवारपर्यंत निव्वळ 1,134.57 कोटी रुपयांच्या मूल्याचे समभाग खरेदी झाले आहेत. याचाही प्रभाव बाजारात राहिला आहे.
सध्याला कोविडचा प्रभाव कायम असला तरी अन्य प्रकारे नियोजन करुन गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळण्याचे संकेत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहेत. यासोबत आशियातील अन्य बाजारामध्ये जपान, दक्षिण कोरियाचा बाजार तेजीत राहिला असून चीन व हाँगकाँगचा बाजार घसरणीसह बंद झाला आहे.








