प्रतिनिधी / नागठाणे
शेंद्रे (ता. सातारा) येथील अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकरिता नुकतीच मदत करण्यात आली.पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पोतेकर यांनी सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पोतेकर, वसंत पडवळ, रवींद्र वाघमारे, यासीन मुलाणी, संजय आडके तसेच संचालक उपस्थित होते.








