थंडीत भुईमुगाच्या शेंगा खाण्याचं प्रमाण वाढतं. त्यातही या दिवसात भाजलेल्या शेंगा खाल्ल्या जातात. या शेंगा खूप आरोग्यदायी असतात. शेंगांमुळे थंडीत ऊबही मिळते. मात्र अधिक प्रमाणात शेंगा खाल्ल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. अतिप्रमाणात शेंगा खाल्ल्यामुळे होणार्या दुष्परिणामांविषयी…
* शेंगांमध्ये फॅट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे सतत शेंगा खाल्ल्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. लेक्टिन या घटकामुळे शेंगा लवकर पचत नाहीत. यामुळे आम्लपित्त, अपचनासारखे त्रास होऊ शकतात.
* शेंगा अतिप्रमाणात खाल्ल्यास यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. यातल्या अफलेक्टोसिन या घटकामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं. आर्थ्रायटिसच्या रुग्णांनी शेंगा खाऊ नयेत.
* शेंगदाणे खाल्ल्याने ऍलर्जीही होऊ शकते. त्वचेवर पुरळ उठणं, खाज येणं, चेहरा सुजणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
* शेंगा अधिक प्रमाणात खाल्ल्यास श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. अस्थमाचं प्रमाण वाढू शकतं. थायरॉइडचा त्रास असणार्यांनी शेंगा खाऊ नयेत.









