ऑनलाईन टीम / टोकियो :
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सन 2050 पर्यंत जपान शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करेल, असे म्हटले आहे.
मागील महिन्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये सुगा यांनी कार्बन उत्सर्जनाबाबतचे हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले.’ग्रीन सोसायटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे.
जपानमधील 56 टक्के ऊर्जा जीवाश्म इंधनांपासून मिळवली जाते. त्यामुळे आपल्याला जीवाश्म इंधनांपासून दूर जाण्याची गरज आहे, असे सुगा यांनी म्हटले आहे.









