वारणानगर / प्रतिनिधी
नेसरी येथील रोशनबी शमनजी कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी सौरभ आण्णासाहेब भिकाप्पा पाटील म्हाळुंगे (ता. करवीर) येथे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषीविषयक प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन देत आहे. या माध्यमातून त्यांनी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेले रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय नेसरी यांच्यावतीने राबवण्यात येणारा ग्रामीण कृषी जागृकता आणि औद्योगिक कार्यानुभव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या गावातून राबविण्यात येत आहे.
फळांची शीतगृहातील साठवण काढणीनंतर फळांमध्ये काही जैविक आणि रासायनिक क्रिया होत असतात. फळे कमी तापमान व योग्य आद्रतेमध्ये साठवल्यास या क्रियांचा वेग मंदावतो त्यामुळे फळांची साठवण कालावधी वाढवण्यास मदत होते असे वातावरण तयार करण्यासाठी शीतगृहाची आवश्यकता भासते.
शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते याचे त्याचे महत्त्व पटवून देत त्यांना योग्य मार्गदर्शन केले. या प्रात्यक्षिकांसाठी प्राचार्य आर. बी. बिरादर, कार्यक्रम समन्वयक बी.बी. कडपे आणि विस्तार विभाग प्राध्यापक एम.डी. माळी, त्याच्यासोबत विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









