महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
शुन्यबिंदु नामावली गृहीत धरुन आंतरजिल्हा बदली कराव्यात. 10 टक्के रिक्तपदाची अट नठेवता आंतरजिल्हा बदल्याकरुन त्वरीत शिक्षक भरती प्रक्रिया राबवून रिक्त पदे भरावीत. आंतरजिल्हा बदली साठी शिक्षकांना पुर्वी दिलेल्या एनओसी चा विचार करुन त्यांना प्राधान्य क्रम द्यावा. आपसी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
निवेदनात म्हंटले आहे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहितदादा पवार यांच्याबरोबर बैठक झाला. त्यानंतर जुनी पेन्शन योजना लागु करावी. प़्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 30 व 40 हजार करावी. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करुन खंड 2 प्रकाशित करावा. जि.प. व मनपा,न.प शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 पर्यतच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करावे. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नयेत. शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कँशलेश सुविधा द्यावी. प़्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी फी माफीसाठी आर्थिक तरतुद करावी. बदल्याची टक्केवारी असावी, सेवाजेष्टतेनुसार बदल्या कराव्यात, बदलीसाठी 30 मे ऐवजी 30 जून तारीख ग्राहÎ धरावी. एका शाळेवर प्रशासकीय बदलीसाठी 5 वर्षे व विनंती बदली साठी 3 वर्षे सेवेची अट असावी.
जिल्हाबदलून आलेल्या शिक्षकांची विनंती बदलीसाठी पुर्वीच्या जिल्ह्यातील सेवा ग्राहÎ धरावी. स्तनदा माता व एकल महिलांना बदलीस प्राधान्य द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, बाळासाहेब झावरे, आबासाहेब जगताप, राज्य संपर्क प्रमुख एस व्ही पाटील, राजेश वाघमारे, मनोज मोरे,जिवनराव वडजे, मिलिंद गांगुर्डे,दत्तात्रय पवार,विशाल खरमोडे,किशोर पवार, रामदास आव्हाड, रविंद्र घरत, प्रकाश मसले, संदिप मोरे आदी उपस्थित होते.