प्रतिनिधी/ म्हसवड
शुभम भारत एजन्सीने नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातुन माणुस की जपण्याचे काम करत आली आहे एका दशीची वारी आसो महिला दिन आसो वा पुर परिस्थीती आसो सध्याच्या कोरोनाच्या पार्शभुमिवर मास्क व, सॉनिटायझर वाटप , गरजुना कोरडा विधा वाटप केले तर आम्ही म्हसवडकर यांनी सुरु केले दोन घास सुखाचे यांच्या मार्फत रोज गरजु व शहरातील सर्व हॉस्पिटल दवाखाने येथील आजारी लोकांना चहा नाष्टा देण्याचे काम प्रेरणादायी असुन त्यांच्या या कामाचे कौतुक करावे तेवढे थोड़े आहे असे भाजपाचे आ. जयकुमार गोरे यांनी शुभम भारत एजन्सी च्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करतेवेळी व्यक्त केले
शुभम भारत एजन्सीच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप भाजपाचे आ जयकुमार गोरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले यावेळ म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे, पत्रकार विजय टाकणे, अहमद मुल्ला, अनिल व्होरा, पत्रकार शंकर पानसांडे, सचिन मेनकुदळे,शुभम पोरे,करण पोरे. माण तालुका राष्ट्रीय कॉग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ.सुवर्णा पोरे,चंद्रकांत पोरे
हे उपस्थित होते.
यावेळी सुनिल पोरे यांनी या गोळ्याची माहिती देताना सांगीतले सध्या भारतात कोविड 19 या विषाणू मुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. आयुष मंत्रालयाने या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम 30 या औषधोपचार करण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत.
या औषधाचा परीणाम अधिक उतम होत असुन रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढते आहे. हे लक्षात आले आहे. अनेक रुग्ण या औषधोपचार मुळे बरे झाले आहेत. यासाठी या गोळ्या दररोज 4 या प्रमाणे तीन दिवस खाल्याने प्रतिकार शक्ती वाढते. व कोरोना ची लागण होत नाही. या गोळ्या लहान मुले वृध्द यांच्या सह सर्व लोकांना उपयुक्त आहेत. या औषधाला कोणत्याही साईट इफेक्ट नाही.
या औषधाचे महिन्यातून तीन दिवस डोस घेतल्यास कोराना पासून बचाव होऊ शकतो.असे शुभम गैसचे मालक इंजीनियर सुनील पोरे यांनी सांगितले आहे.
सुत्रसंचलन पत्रकार विजय टाकणे यांनी तर आभार करण पोरे यांनी मानले यावेळी पत्रकार , सामाजिक क्षेत्रातील मंडळी, महिला उपस्थीत होत्या यावेळी सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला होता









