ऑल इंडिया खुली कराटे स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे झालेल्या ऑल इंडिया खुल्या निमंत्रितांच्या कराटे स्पर्धेत बेळगावच्या शुटोकॉन कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या 13 कराटेपटूंनी यश संपादन केले.
या स्पर्धेत अनेक राज्यातून जवळपास दोन हजारहून अधिक कराटेपटू सहभागी झाले. बेळगावच्या शुटोकॉन कराटे स्पोर्ट्स अकादमीच्या रत्नश्री पाटील, अनुश्री एलजी, रूद्राक्षी कार्वेकर, ऋतुराज बाकले, हर्षवर्धन बर्गे यांनी सुवर्ण पदक, वैभवी पाटील, सोनाली पाटील, रोहन पवार, विराट कदम, पुंडलिक पाटील यांनी रौप्यपदक तर सौरभ धामणेकर, अंश उचगावकर, निशिगंधा मुतकेकर यांनी कांस्य पदक पटकाविले. या सर्व कराटेपटूंना कराटे प्रशिक्षक चंदन जोशी व नागराज जोशी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे.









