प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. सलग तीन दिवस रोज रुग्णसंख्येने 45 चा आकडा पार केला असून गेल्या 24 तासात 101 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील 22 जणांचा समावेश आहे.
राणी चन्नम्मानगर, संगमेश्वरनगर, लक्ष्मी टेकडी, जालगार गल्ली, शिवबसवनगर, भाग्यनगर, रामतीर्थनगर, हिंदवाडी, बसवाण गल्ली, संभाजीनगर, टिळकवाडी, आर्मी क्वॉर्टर्स, जेएनएमसी कॅम्पस, मराठा कॉलनी, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रायबाग तालुक्मयातील ब्याकुड येथे तर एकाच कुटुंबातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 505 इतकी झाली असून त्यापैकी 26 हजार 879 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्या 272 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 31 मार्च रोजी 52, 1 एप्रिल रोजी 49 व 2 एप्रिल रोजी 45 असे केवळ तीन दिवसात 146 रुग्ण आढळून आले आहेत.
अद्याप 34 हजार 771 हून अधिक जण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 978 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे. आतापर्यंत 5 लाख 89 हजार 178 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 55 हजार 479 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. रोज रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नियम आणखी कडक केले आहेत.
खास करून महाराष्ट्रातून बेळगावात येणाऱयांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी नियमावली आणखी कडक केली आहे. बार, स्विमिंग पूल, चित्रपटगृहात उपस्थिती किती असावी, याविषयीची मार्गसूची जारी करण्यात आली असून संपूर्ण राज्यात सहावी ते नववीपर्यंत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. चालू महिन्याअखेरपर्यंत रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होणार, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.









