प्रतिनिधी / सांगली
वसंतदादा अर्थात दत्त इंडिया प्रा. लि. या कारखान्याने एक रक्कमी एफआरपी दिलेली नाही. त्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. मात्र शब्द पाळला नाही त्यामुळेच शुक्रवार दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दत्त इंडिया कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.
दत्त इंडिया कारखान्याला ऊस घालवलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे त्यानंतर अन्य कारखान्या समोर असेच आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती महेश खराडे व पोपट पोरे यांनी दिली.








