प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात कोरानाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच मागील तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. तर दिवसभरात संसर्गमुक्त होणाऱयांची संख्याही कमी झाली आहे. राज्यात शुक्रवारी देखील 16,068 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 22,316 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांमध्ये 364 जणांचा बळी गेला आहे. मागील दोन आठवडय़ातील ही सर्वात कमी बळींची संख्या आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात शुक्रवारी 1,50,610 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी कोरोना पॉझिटिव्हीहीचा दर 10.66 टक्के इतका आहे. तर मृत्यूचा दर 2.26 टक्के इतका आहे. राज्यात मृत्यूचा दर वाढत असून नव्या बाधितांची नोंद कमी होत असतानाच मृतांचा आकडा मात्र, अधिक असल्याने आरोग्य खात्यासमोरील आव्हान कायम आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णसंख्या 2,80,186 इतकी आहे.









