डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक हैराण : त्वरित गटारी स्वच्छ करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहराचा स्मार्टसिटीमध्ये समावेश झाला. मात्र स्मार्टसिटी होण्याऐवजी बेळगाव समस्यांची सिटी बनताना दिसत आहे. स्मार्टसिटी कार्यालय असलेल्या टिळकवाडी येथील शुक्रवारपेठमध्येच गटारी तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. गटारी साफ करण्याबाबत महापालिका तसेच इतर अधिकाऱयांकडे पाठपुरावा केला. मात्र अजूनही फिरकले नाहीत. त्यामुळे ज्ये÷ नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शुक्रवार पेठ ते गोवावेसकडे जाणाऱया रस्त्यावरील गटार तुंबली आहे. ती साफ करण्यास कोणीच येत नाहीत. पाणी तुंबल्यामुळे दुर्गंधीबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शुक्रवारपेठपासून जवळ असलेल्या गुरुवारपेठमध्येच स्मार्टसिटीचे कार्यालय आहे. त्यामुळे जणू झाडाखालीच अंधार असल्याचा प्रकार टिळकवाडीत घडत आहे.
डासांमुळे आजारांना निमंत्रण
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. असे असताना आता या डासांच्या प्रादुर्भावामुळे दुसऱया आजारांना निमंत्रण देणेच ठरले आहे. तेंव्हा तातडीने या गटारी साफ कराव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.









