प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरानजीक असलेल्या शीळ येथील धरणात फणसवळे आंबेकरवाडीमधील तरूणाचा बुडून मृत्यू झाल़ा ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडल़ी 12 तासांच्या प्रयत्नांनतर मंगळवारी सकाळी मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आल़े
राजेश भरत आंबेकर (23, ऱा फणसवळे आंबेकरवाडी) असे मृत तरूणाचे नाव आह़े पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश हा सोमवारी सायंकाळी धरण परिसरात गेला होत़ा यावेळी त्याचा तोल जावून पाण्यात पडल्याने तो बुडून बेपत्ता झाला होत़ा या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होत़ी तसेच पोलिसांचे पथक देखील राजेश याचा शोध घेण्यासाठी दाखल झाले होत़े
सोमवारी रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या राजेश याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल़ा मात्र त्याची कोणतीही माहिती मिळून आली नव्हत़ी अखेर मंगळवारी सकाळी धरणाच्या पाण्यात राजेश याचा मृतदेह स्थानिकांना मिळून आल़ा या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात आला आह़े









