वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत लुगे या क्रीडाप्रकारात भारताचा शिवा केशवन सहभागी होत आहे. लुगे प्रकारात भाग घेणारा केशवन हा भारताचा पहिला खेळाडू आहे. दरम्यान अखिल भारतीय लुगे फेडरेशनने भारताच्या राष्ट्रीय लुगे संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी शिवा केशवनची नियुक्ती केली आहे.
ं भारताच्या राष्ट्रीय लुगे संघाचा शिवा केशवन हा संचालकही आहे. या क्रीडाप्रकारात शिवा केशवनने दर्जेदार कामगिरी केल्याने त्याचा यापूर्वी अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. आता शिवा केशवनवर भारतीय लुगे फेडरेशनने संचालक आणि प्रमुख प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी टाकली आहे. 1998 ते 2018 या कालावधीत झालेल्या सहा हिंवाळी ऑलिंपिक स्पर्धेत शिवा केशवनने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 2018 साली त्याने या क्रीडाक्षेत्रातून निवृत्ती पत्करली होती.









