7 कोटी 47 लाख तुटीचा अर्थसंकल्प एकमताने मंजूर
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचा 2022-23 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक अर्थसंकल्पात 531.19 कोटीची रक्कत जमा आहे. 538.66 कोटीचा खर्च अपेक्षित होता. परंतू अधिसभा सदस्य ऍड. धैर्यशील पाटील यांनी 7.47 कोटी तूटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी झालेल्या अधिसभेत सादर केला. ही तूट विद्यापीठ निधीतील शिल्लकेतून भरून काढली जाणार आहे. या अर्थसंकल्प संशोधनावर भरीव 2.75 कोटीची तरतूद केली आहे. संशोधनाला चालणा देणारा व सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याने अधिसभा सदस्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत एकमताने मंजूर केला. अधिसभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. सचिवपदी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऍड. धैर्यशील पाटील यांनी ऑनलाईन पध्दतीने मुद्देसुदपणे वार्षिक अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडल्याने अधिसभा सदस्यांवर त्याचा चांगलाच प्रभाव पडला. त्यांनी विधीमंडळाप्रमाणे मधून मधून केलेल्या शेरशायरीला सभागृहाने टाळयांच्या गजरात स्वाकारले. तर शेरशायरी करताच सभागृहात एकच हश्यांचे फवारे उडले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे ऍड. पाटील यांनी दिली. प्रशासकीय विभागाकडून 39.84 कोटी, शास्त्र अधिविभागांकडून 3.56 कोटी, इतर अधिविभागांकडून 2.38 कोटी जमा होण्याची अपेक्षा आहे. इतर उपक्रमांमधून 25.40 कोटी असे एकूण 70.44 कोटी विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा होणे अपेक्षित आहे. घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून 16.60 कोटी जमा होणे अपेक्षित आहे. प्रस्तावित खर्चामध्ये प्रशासकीय विभागाकडून 60.80 कोटी , शास्त्र अधिविभाग 5.65 कोटी, इतर अधिविभाग 5.48 कोटी, विविध सेवा व इतर उपक्रम 44.03 कोटी असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील 116.14 खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च 130.29 कोटी, तर विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाया निधीमधून खर्चासाठी 130.29 कोटी, तर विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाया निधीमधून खर्चासाठी 9.31 कोटी तसेच संशोधन व विकास निधी 30.20 कोटी व घसारा निधी 16.60, निलंबन लेखे 236.11 कोटी अशी एकूण 538.65 कोटी खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे.
अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे ः
-संगणक प्रणाली विकसित करणे ः 1 कोटी
-विद्यापीठ मेरीट स्कॉलरशिपः 50 लाखविद्यापीठातील 37 परदेशी विद्यार्थी सोयी सुविधा ः 48.06 लाख
-क्रीडा विकास ः 1 कोटी
-माजी विद्यार्थी मेळावा ः 5 लाख
-आझादी का अमृत महोत्सव ः 25 लाख
-सेंटर फॉर क्लायमॅट चेंज ः 20 लाख
-यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर इमारत ः 1.50 कोटी
-पाणीपुरवठा ः 95 ला
-फायर सेफ्टी ः 1 कोटी
-गोल्डन जुबली रिसर्च स्कॉलरशिप ः 80 लाख
-हिरक महोत्सवी वर्षानिमित्त संगीत रजनी ः 3 लाख
-विद्यापीठ परिसर सुशोभिकरण ः 1 कोटी
-नवीन रस्ते ः 1 कोटी
-दिव्यांग सुविधा ः 1.25 कोटी “
विद्यार्थी वसतिगृह ः 2.35 कोटीयोजना
जुगळे यांची व्यवस्थापन सदस्यपदी निवड
प्राचार्य गटातून विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून प्राचार्य डॉ. योजना जुगळे यांची व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड केली. सभागृहात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून त्यांचा सन्मान केला. सभागृहाने टाळयांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.