मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबईतील मराठमोळ्या वस्तीत तसेच दक्षिण मुंबईपासून ते पूर्व आणि पश्चिम उपनगरात नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा कार्यक्रम आहे. पण या दौऱ्यासाठी लागलेल्या शुभेच्छांच्या बॅनर्सची शहरात गर्दी झाली आहे. मुंबई महापालिकेकडून हे बॅनर्स आज सकाळी काढून टाकण्यात आले. मुंबई मनपा कर्मचाऱ्यांनी अनधिकृत बॅनरवर कारवाई करत, या भागातील बॅनर हटवले.
आज सकाळी १० वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून छत्रपती शिवाजी महारात यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून यात्रेला सुरुवात होणार आहे. या जन-आशिर्वाद यात्रेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पण आता नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेत बदल करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघ वरळीत जाणं टाळलं आहे. वरळीतील नारायण राणेंची सभा रद्द करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








