कुंभोज / वार्ताहर
कुंभोज तालुका हातकणंगले येथे शिवाजी नगर शाहूनगर परिसरात सध्या वानरानी धुमाकूळ घातला असून, सदर वानरांच्या त्रासला कुंभोज ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात कंटाळले आहेत. परिणामी नर जातीचा वानरानी शिवाजीनगर परिसरातील काही महिलांच्या वर हल्लाही केला आहे. त्या हल्ल्यामध्ये महिला जखमी झाल्या आहेत.ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्यावर प्राणघातक हल्ले,वानराचा बंदोबस्त करणाची नागरिकांची मागणी
ऊस वाहतूक करणाऱ्या व अन्य ट्रॅक्टर ची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या वर सदर नर वानर धावून जात असून, त्यांना मारहाण करत आहेत .
परिणामी सदर वानरांच्या धास्तीने शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामपंचायत कुंभोज वन विभागाने लक्ष घालून सदर वानरांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणतीही मोठी जीवित आणि झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. परिणामी सदर वानरांचे रुद्र रूप पाहता नागरिक सदर ठिकाणाहून पळ काढत असून एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होऊनही सदर वानरांचा कळप आहे त्या ठिकाणी बसून राहून सदर नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करतो, परिणामी शिवाजीनगर परिसरातील महिला सध्या भीतीच्या वातावरणात खाली वावरत असून दोन महिलांच्यावर वानरानी केलेला हल्ला सध्या चर्चेचा विषय बनत आहे परिणामी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. असे मत शिवाजीनगर परिसरातील सुज्ञ नागरिक राजू सुतार यांनी बोलताना व्यक्त केले.








