परिसरात दुर्गंधी : काही भागात कचऱयाची उचल करण्याकडे मनपाचा कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील कचऱयाची उचल दोन वेळा करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने चालविला आहे. पण काही भागात कचऱयाची उचल करण्याकडे मनपाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शिवाजी कॉलनी परिसरात रस्त्यावर कचऱयाचे ढिगारे साचत असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हीच काय स्मार्ट सिटी, असा मुद्दा उपस्थित होत आहे.
शहरातील कचऱयाची उचल वेळेवर आणि व्यवस्थित केली जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. कचऱयाच्या मुद्यावरून मनपा कार्यालयात विविध घडामोडी घडल्या आहेत. स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेने पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते आणि दोन पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांवर सोपविली आहे. 3 अधिकारी कार्यरत असूनही स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याची टीका नागरिक करीत आहेत. मराठा कॉलनी परिसरात रस्त्याशेजारी कचऱयाचे ढिगारे साचत असून स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही भागातील कचऱयाची उचल दिवसातून दोन वेळा केली जाते. पण मराठा कॉलनीतील कचऱयाची उचल चार दिवसांतून एकदादेखील केली जात नसल्याने हे ढिगारे साचत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जातो. पण प्रत्यक्षात काही ठिकाणी कचऱयाची गाडी वेळेवर येत नसल्याने कचरा रस्त्याशेजारी टाकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळेच मराठा कॉलनी परिसरात ही समस्या निर्माण झाली आहे. येथील स्वच्छतेसाठी महापालिकेकडे सातत्याने तक्रार केली जाते. पण कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळेच या ठिकाणी कचऱयाचे ढीग साचत आहेत. कचऱयामुळे दुर्गंधी पसरत असून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे कचऱयाची उचल वेळेत करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.









