तामिळनाडूच्या राज्यपालांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणीचा आरोप
वृत्तसंस्था/ चेन्नई
द्रमुकने बुधवारी शिवाजी कृष्णमूर्ति यांचे निलंबन बुधवारी रद्द केले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे कृष्णमूर्ति यांना जानेवारी महिन्यात पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
कृष्णमूर्ती यांनी स्वत:च्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे. यामुळे त्यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याचे द्रमुककडून सांगण्यात आले. राज्यपाल रवि यांच्यासंबंधी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे कृष्णमूर्ति यांना पक्षाकडून तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आले होते. पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे तेव्हा द्रमुकने म्हटले होते. कृष्णमूर्ति यांनी राज्यपाल रवि यांच्यावर हल्ला करू शकतो अशी प्रश्नार्थक टिप्पणी केली होती. द्रमुक अन् राज्यपाल रवि यांच्यात मागील काही काळापासून वाक्युद्ध सुरू आहे. द्रमुक सरकारकडून राज्यपाल रवि यांच्याविरोधात विधानसभेत प्रस्तावही मांडण्यात आला होता.









