प्रतिनिधी / बेळगाव
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर दुसरी गल्ली येथे श्री आदिशक्ती महिलामंडळाची स्थापना करण्यात आली. यानिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका मिनाक्षी चिगरे होत्या तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जिजाऊ महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा सुलभा नाईक उपस्थित होत्या.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या प्रभुजी श्रीनिवास नायक यांनी मार्गदर्शन केले. धर्म व महिला संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक महिलेचे कार्य महत्वाचे आहे. जिजाऊ मातेनी छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले व आपला धर्म व संस्कृती कसे सांभाळायचे याचे शिक्षण शिवाजी महाराजांना दिले. त्याप्रमाणेच प्रत्येक महिलेने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रभुजी श्रीनिवास यांनी सांगितले. महिलांची प्रगती करण्यासाठी संघटनेने प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे सुलभा नाईक यांनी सांगितले. फक्त मुल व चूल ही परंपरा मोडित काढण्यात आली आहे. ही परंपरा कायम ठेवून प्रगती करण्यासाठी प्रत्येक महिलेने प्रयत्न केले पाहिजे. महिला मंडळाच्या माध्यमातून आपल्या भागातील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. तसेच आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी प्रत्येक महिलेने सहभाग घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका मिनाक्षी संजय चिगरे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी 90 टक्क्मयाहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व मिनाक्षि चिगरे, सुलभा नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी उर्मिला लाड, गिता दीडे, शोभा पाटील, नमिता सुरेश सावंत, मंगल श्रीकांत शहापूरकर, सविता भोई, अश्विनी शहापूरकर, पुनम लाड, संगिता पाटील, लिला चिगरे, सुमन पाटील, शितल जाधव, लक्ष्मी वकुंड, प्रतिक्षा पाटील, भारती चिगरे, सुवर्णा जोशीलकर, रंजना मरणहोळकर, लक्ष्मी राजगोळकर, पुजा किल्लेकर, शोभा चिगरे, मालन हिरेमठ, गिता जांबोटकर आदींसह महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या, कार्यकर्त्या व दुसरी गल्ली शिवाजीनगर येथील महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता चव्हाण (चिगरे) यांनी केले. व उर्मिला महेश लाड यांनी आभार व्यक्त केले.