प्रतिनिधी / रत्नागिरी
कोकणात आता शिवसेना विरुध्द राणे पिता-पुत्र असा राजकीय वर्चस्वासाठी उसळलेला वणवा आता अधिकच भडकू लागला आहे. सेनेचे खासदार विनायक राऊत विरुध्द माजी खासदार निलेश राणे अशा दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे.
त्यात आपल्या नेत्यांवर होत असलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांनीही उडी घेतली आहे. शनिवारी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या निषेधासाठी रस्त्यावर उतरून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘चप्पल मारो’ आंदोलन केले.









