ऑनलाईन टीम
राजकारणात वादग्रस्त विधानामुळे अनेक नेते नेहमी चर्चेत असतात. मात्र महाराष्ट्रातील शिवसेनेचे एक जेष्ठ नेते एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी बोलता बोलता मुख्यमंत्री म्हणून चक्क काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा उल्लेख केला. पक्षाचे प्रमुखच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना राऊत यांना याचा विसर पडला आहे. राऊत यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विनायक राऊत हे काल, शनिवारी (२ ऑक्टोबर) सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंजिवडे घाटाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी, प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी चक्क महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला.
भाषणामध्ये नेत्याकडून आक्षेपार्ह उल्लेख आणि विधानं सातत्याने होत असतात. मात्र, आपल्याच पक्षप्रमुखांच्या पदाचा विसर पडणं म्हणजे आश्चर्य चकीतच. इतकच नाही तर शिवसेनेच्याच बड्या नेत्याला याचा विसर पडल्याने या विधानाची खिल्ली उडवली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








