वार्ताहर / चंदूर
हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथील माजी शिवसेना प्रमुख व शिवसेनेचे सक्रिय नेते विशाल वसंत माने यांचे दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मनमिळावू स्वभाव व तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे आत्मीयतेने करणारा नेता अशी ओळख असलेला शिवसेनेचा नेता हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









