प्रतिनिधी / बेळगाव
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या बेळगाव जिल्हा समन्वयकपदी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची निवड करण्यात आली आहे. पुढील एक वर्षाकरिता ही नेमणूक असणार आहे. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे यांनी या नियुक्तीचे पत्र पाठविले आहे. शिवसेना मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात राखीव खाट उपलब्ध करून देणे, सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणी असणाऱया रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करणे असे कार्य करण्यात येते. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शेळके यांची निवड केली आहे.









