ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व 403 जागा लढवणार आहे. संघटनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना राज्यप्रमुख ठाकूर अनिल सिंग यांनी याबाबत माहिती दिली.
दारुलशफा येथे झालेल्या बैठकीत अनिल सिंग म्हणाले, भाजप सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यात स्त्रिया सुरक्षित नाहीत. राज्यातील वैद्यकीय व शिक्षण पद्धतीचीही दुरवस्था झाली आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. उत्तर प्रदेशमधील सरकार ब्राह्मणांना चांगली वागणूक देत नाही. त्यामुळे जनता भाजपच्या कारभारावर नाराज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्वच्या सर्व 403 जागा लढणार आहे.









