वार्ताहर / हुपरी
हुपरी येथील शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांना थोडा त्रास होत असताना त्यांची कोरोना टेस्ट केली असता पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव सध्या सर्वत्र कोरोना धुमाकूळ घालत असताना देखील घरी न थांबता मतदार संघातील शिवसैनिक व नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये याकरिता त्यांना माहिती सांगण्यासाठी आणि येणाऱ्या आडी अडचणी सोडविण्यासाठी फिरत होते. त्यावेळी कोरोनाची काही लक्षणे जाणवत होती या पार्श्वभूमीवर तपासणी करून घेण्यात आली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून सध्या तब्येत बरी आहे. योग्य उपचार व काळजी घेतली जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी मनातील शंका दूर करण्यासाठी तपासणी करून घ्यावी मी लवकरच पुन्हा जनतेच्या सेवेसाठी रुजू होत आहे. असे मनोगत मुरलीधर जाधव यांनी फोनवरून विचारणा केली व्यक्त केले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विधानसभा सदस्य, खासदार, माजी खासदार नेतेमंडळी, पदाधिकारी यांना कोरोना लागण झाली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









