कडक पोलिस बंदोबस्त
कणकवली / प्रतिनिधी:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे शुक्रवारी रात्री शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. जिल्हाभरातून शिवसैनिक येथे गोळा झाले असल्याने कै. श्रीधर नाईक चौकातील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेचा शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतआहे. रात्री ही यात्रा कणकवलीत दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडे शिवसैनिक सायंकाळपासून मोठ्या संख्येने गोळा होताना दिसत आहेत. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, अवधूत मालनकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, ऍड. हर्षद गावडे, संदेश पटेल, कन्हैया पारकर, नीलम सावंत पालव, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, माधवी दळवी, भूषण परुळेकर, रामदास विखाळे, संतोष सावंत, रीमेश चव्हाण यांच्यासहित जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते गोळा झाले होते.सायंकाळी शिवसेना कार्यकर्ते येथील कार्यालयाजवळ गोळा होताच कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांचे एसआरपीएफचे जवानही तैनात करण्यात आले होते. कार्यालयाजवळ एकत्रित होत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.