पुणे \ ऑनलाईन टीम
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या वाढदिवसानिमित्ता पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सन्मान केला.
बाबासाहेब पुरंदरे आज १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच, ९९ दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी खास उपस्थिती लावली.
राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबपुष्प व पगडी देऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.
Previous Article… तर सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही : संजय राऊत
Next Article पंकजा मुंडेंची परळीत पूरग्रस्तांसाठी मदत फेरी








