शिवमोगा/प्रतिनिधी
शिवमोगा जिल्ह्यात झालेल्या स्फोटात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यात किमान सहाहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. ताब्यात घेण्यात जिलेटिनच्या काड्यांचा ट्रक भरधाव वेगात जात असताना हा स्फोट झाला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शिमोगा, त्याच्या मूळ जिल्ह्यातील हुणुसगोडमध्ये दगड क्रशर सुविधागृहात झालेल्या स्फोटात जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. काल रात्रीपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले आणि बचावकार्य राबवण्यासाठी पथक पाठवले असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
शिवमोगाचे उपायुक्त के. बी. शिवकुमार यांनी शुक्रवारी या स्फोटात कमीतकमी १० ते १५ लोक मरण पावले आहेत. पोलिसांना त्यांचा तपास पूर्ण करु द्या, अशी माहिती दिली. सुरुवातीला भूकंप समजल्या जाणाऱ्या या स्फोटाचा आवाज शेजारच्या दावणगिरी, चिकमंगळूर आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातही ऐकू आला.शिवमोगामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. तसेच पीडितांचे मृतदेह ओळखले जाऊ शकले नाहीत.









