शिवमोगा/प्रतिनिधी
शिवमोगा येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटात कमीतकमी आठ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिलेटीच्या कांड्यांमुळे हा मोठा स्फोट झाला. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकार बाधित झालेल्यांसाठी मदत पुरवित असल्याचे सांगितले.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट करत “शिवमोगा येथे झालेल्या जीवितहानीमुळे जखमी, शोकग्रस्तांच्या कुटुंबियांना सहानुभूती. जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करीत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.









