बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपाचा पॉवरहाऊस म्हणून ओळखला जाणारा शिवमोगा येथे २ आणि ३ जानेवारी रोजी राज्य भाजप कोर कमिटी व कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील हे दोन्ही बैठकीचे अध्यक्ष आहेत.
मुख्यमंत्री बी. येडियुराप्पा , राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अरुण सिंग आणि पक्षाचे अन्य प्रदेश नेते शुक्रवारी सायंकाळी शहरातहोणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीस उपस्थित राहतील.
कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे सुमारे १५ ते १८ नेते भाग घेतील व इतर पक्ष नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे राज्य भाजपच्या सूत्रांनी सांगितले. बेळगाव येथे शेवटची बैठक झाली. गेल्या एक महिन्यापासून राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा आढावा कोर समितीच्या बैठकीत घेण्यात येईल.
याशिवाय नुकतीच विधानपरिषदेत झालेला गोंधळ आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती एस.एल. धर्मे गौडा यांची आत्महत्या, गोहत्या बंदीविरोधी कायदा आणि पुढील कारवाईच्या मुद्यांवर नंतर झालेल्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर प्रदेश भाजपा नेत्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील की मंत्रिमंडळ विस्तार याबाबत काही स्पष्टता नाही. तर, कर्नाटकचे भाजपा प्रभारी अरुण सिंह आणि केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधी बैठकीत संदेश देण्याची शक्यता आहे.
कार्यकारी समितीची बैठक ३ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते साडेपाच दरम्यान शहराच्या बाहेरील पीईएस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कँपसमधील पराना सभागृहात आयोजित केली आहे.









