प्रतिनिधी/ बेळगाव
चीनच्या सीमारेषेवर देशाचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना रविवार दि. 28 रोजी शिवप्रतिष्ठानतर्फे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सकाळी 6 वा. शिवाजी उद्यान येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी धारकऱयांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले.
शिवप्रति÷ान हिंदुस्थानतर्फे ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रायगडावर उभारण्यात येणाऱया सुवर्ण सिंहासनासाठी खडा पहारा ही योजना आखण्यात आली आहे. या योजनेसाठी 5 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नोंदणी केली जाणार आहे. यासाठी ताशिलदार गल्ली विभागातून सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच येत्या श्रावण मासात शिवचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
देशाचे जवान आपल्या जीवाची तमा न बाळगता देशसेवेसाठी आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत. हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता प्रत्येक भारतीयाने त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवले पाहिजे. त्यांच्या बलिदानाची आठवण प्रत्येक बेळगावकराला होत रहावी, यासाठी शिवप्रतिष्ठानने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीला शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, शहर कार्यवाहक विश्वनाथ पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, युवराज पाटील, गजानन पवार, सचिन केळवेकर, अंकुश केसरकर, नामदेव पिसे, तुकाराम पिसे, उमेश ताशिलदार, रमेश चौगुले, राजू कदम, प्रमोद चौगुले, किशोर पाटील यांसह इतर उपस्थित होते.









