प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली असून या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे या 29 वर्षांच्या तरुणाने आई आतेभाऊ व स्वतः गोवा येथे नातेवाईकांच्या कडे जाणार होते कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने जिल्हा बंदी तसेच आंतरराज्य बंदी घालण्यात आली आहे या तरुणाने व नातेवाईकानी दोनच दिवसापूर्वी जयसिंगपूर येथील खाजगी रुग्णालयात तिघांची तपासणी केली होती त्यातील या तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर अन्य दोघांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे ही माहिती आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेकडे कळविण्यात आली नगरपरिषदेने तातडीने आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टरची संपर्क साधून संबंधित तरुणांचा स्वब घेऊन तपासणीसाठी सी पी आर रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे ही बातमी शिरोळ शहरात वार्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मुख्याधिकारी तैमुर मुलांनी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की संबंधित तरुणासह अन्य चौघांना covid-19 केअर सेंटर याठिकाणी ठेवण्यात आले आहे संबंधित दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर एकाचा पॉझिटिव आला आहे हा रिपोर्ट खाजगी असून रात्री उशिरापर्यंत शासकीय रिपोर्ट प्राप्त होईल रिपोर्ट आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तसेच तो भाग शील करणार असल्याचे त्यांनी सांगितले शहरात तातडीने नगर परिषदेने खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी सुरू केली आहे शहरात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे गेल्या तीन महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा नगरपरिषद व नागरिकांनी खबरदारी घेतली होती इतकी खबरदारी घेऊनही या तरुणास कोरोनाविषाणू ची लागण झाली आहे. तो एका खाजगी कारखान्यात तो काम करीत असून कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्याच्या संपर्कात आलेल्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.








