शिरोळ / प्रतिनिधी
बेकायदेशीर वाळू उपसा केलेल्या वाहनावर तहसीलदार विभागाने कारवाई करून वाळूने भरलेला अनेक ट्रक जप्त केले शिरोळ येथील हनुमान मंदिरा शेजारी लावण्यात आलेल्या एका ट्रकच्या केबिनमध्ये राजेश बापू भरगे वय वर्ष 48 राहणार पुष्पक नगर शिरोळ याचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून सदर घटनेची वर्दी पोलिसात देण्यात आली आहे.
मयत अति मद्य प्राशन केलेल्या मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा कयास असून पोलिस अधिक तपास करीत आहेत तहसीलदार वाघाने अनेक गाड्या बेकायदेशीर वाळू मुरूम वाहतूक करणाऱ्या कारवाई करून जप्त करण्यात आल्या आहेत गेल्या पाच-सहा वर्षापासून संपूर्ण जुने व नवीन तहसील कार्यालयाच्या आवारात वाहनांनी भरून गेले आहेत जप्त करण्यात आलेला व दंडात्मक कारवाई ह्याची तुलना केल्यास वाहनधारक या जप्त करण्यात आलेल्या वाहनाकडे दूरच केलेत तहसीलदार विभागाने यापूर्वी लिलावाची बोली घेतली होती.
परंतु म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही अशाच जप्त करण्यात आलेल्या या वाहनांमध्ये अनेक झाडे झुडपे उगवली आहेत याचाच गैरफायदा काही नागरिक घेत असल्याचे दिसून येते शासनाने तातडीने ही वाहने भंगारात घालावी व अशा घडत असलेल्या घटनेला पायबंद घालण्याची मागणी होत आहे आला आहे