प्रतिनिधी / शिरोळ
मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने विवाहिता महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी मिनी गंठण अंदाजे किंमत ६५ हजार रु हिसडा मारून जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना काल मगदूम कॉलेजसमोर आगर भाग रस्ता नजीक घटना घडली आहे. याबाबत संबंधित महिलेने सर्व पोलिसांत अज्ञात चोरट्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विनया राहुलजाखले या आपल्या जाऊ स्वाती जाखले यांच्यासह मोटारसायकलवरून सिद्धिविनायक देवदर्शना करता जात असता आगर भाग वळण रस्त्यानजीक अंदाजे वय ४० ते ४५ अज्ञात इसम गाडीवरून येऊन विजया यांच्या गळ्यातील पासष्ठ हजार रूपये किंमतीचे मिनी गंठण सोनसाखळी हिसडा मारून घेऊन पसार झाले आहेत याबाबत विनया जाखले यांनी शिरोळ पोलिसांत फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरोळ पोलिस अधिक तपास करत आहेत.









