प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील पंचगंगा नदी प्रदूषणात वाढ झाली असून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहे. यामुळे पाण्याला उग्र वास येत आहे. हे पाणी जनावरांनाही पिण्यास अयोग्य बनले आहे. शिरोळ कुरुंदवाड या जुन्या रस्त्यावरील पंचगंगा नदीवर बंधारा असून या नदीच्या पात्रात जलपर्णीचा विळखा पडला आहे संपूर्ण नदीतील पाणी झाले या दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहे. नदी प्रदूषित करणा-या घटकांवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बंडु पाटील यांनी केली आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून पंचगंगा नदी ही शुद्ध झाली होती या नदीच्या पात्रातील पाणी पिण्यासाठी वापरत होते तर पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या बहुसंख्य ग्रामपंचायतीने नळ पाणीपुरवठाद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. कोरोना विषाणूमुळे नदीसह वातावरणही शुद्ध बनले होते.
गेल्या पंधरा तीन आठवड्यापासून पंचगंगा नदीच्या पात्रात रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदी प्रदूषित बनले तसेच जलपर्णीचा विळखा घातला आहे गेले दोन दिवसा पासून पाण्याला उग्रस्वरूपाचा वास येत आहे तर हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहे हे पाणी पिण्यास जनावरांनाही अयोग्य बनले आहे पंचगंगा नदी पात्रातील पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकावर तातडीने कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.