प्रतिनिधी / शिरोळ
बुधवारी रात्री 56 वर्षाच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शनिवार पर्यंत संपूर्ण शहर शंभर टक्के लोक डाउन करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्या 104 व्यक्तींकडून दहा हजार चारशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाविषाणूच्या माहामारीने ग्रामीण भागातही हातपाय पसरू लागले आहे. शिरोळ शहरात प्रथमच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे शिरोळ नगरपरिषद नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली प्रारंभी उपस्थितांचे स्वागत मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांनी करून कोरूना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी मास चा वापर करणे बंधनकारक आहे तसेच विनाकरण बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
सोलापूरहून आठ जणांचे कुटुंब शहरात 29 जून रोजी आले होते त्यापैकी एका महिलेला कोरोना बाधित झाल्या तर अहवाल प्राप्त झाला नगरपरिषदेच्या प्रशासनाने तातडीने हा परिसर सील केला आहे त्यांच्या संपर्कात आलेल्या 17 जणांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आज गुरुवार पासून शनिवार पर्यंत तीन दिवस 100% लॉक डाऊनलोड करण्याचा निर्णय नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी जाहीर करून शहरांमध्ये मास्क न वापरणार यांच्याकडून rs.100 दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच फळविक्रेते भाजी करते यांनी हॅन्ड ग्लोज व मास्क वापर करणे बंधनकारक आहे नियमाचा भंग करणार कारवाई करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले या बैठकीस उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे नगरसेवक राजू चुडमुंगे योगेश पुजारी पंडित काळे श्रीवर्धन माने देशमुख माजी सरपंच गजानन संकपाळ विजय आरगे जनार्दन कांबळे अण्णा पुजारी अमर शिंदे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बी जी माने यांच्यासह प्रभाग समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleलातूर शहर लॉकडाउन वरून महापौर व जिल्हाधिकारी यांच्यात मतभेद
Next Article Metformin औषध आता कोरोना रुग्णांसाठी सुद्धा लाभदायक?








