शिरोळ / प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाने सिरकाव केला असून एका पोलिस कर्मचारयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिस कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या त्याच्या नातेवाईकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता या कर्मचाऱ्यांचा संपर्क आला होता या कर्मचाचयास दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू होते. आगर भाग येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरमध्ये त्यांचा स्वब तपासणीसाठी घेण्यात आला होता. रविवारी सकाळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना घोडावत मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
ते गुन्हे शोध पथकामध्ये काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलिस दलात ही खळबळ माजली आहे.
Previous Articleहुपरीत 9 डॉक्टरांसह कोरोना रुग्णांची संख्या 207 वर
Next Article सांगली : वसगडेत अज्ञात कबरीमुळे खळबळ








